News & View

ताज्या घडामोडी

  • मल्टिस्टेट च्या माध्यमातून मनी लोन्ड्रीग ! गड,देवस्थानच्या पैशावर मालकांचा डल्ला !!

    मल्टिस्टेट च्या माध्यमातून मनी लोन्ड्रीग ! गड,देवस्थानच्या पैशावर मालकांचा डल्ला !!

    बीड- बीड शहरातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था म्हणजे सरकारच्या लायसन वर सुरू असलेली खाजगी सावकारकी असल्याचे समोर आले आहे.मात्र त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने हे मल्टिस्टेट अन पतसंस्थेचे मालक मोकाट झाले आहेत.कोट्यवधी रुपयांच्या ठेवी हाताशी असल्याने यांचे इतर उद्योग फोफावले आहेत.या माध्यमातून मनी लोन्ड्रीग होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय सहकार विभागाकडे झाल्या असल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.बहुतांश…

  • दोन अपघातात दहा ठार ! सागर ट्रॅव्हल्स उलटली !!

    दोन अपघातात दहा ठार ! सागर ट्रॅव्हल्स उलटली !!

    आष्टी- ट्रकला पाठीमागून जाणाऱ्या रुगवाहिकेने जोराची धडक दिल्याने चार जण तर सागर ट्रॅव्हल्स उलटल्याने सहा जण ठार झाल्याची घटना आष्टी नगर हद्दीवर घडली.अपघाताची माहिती मिळताच आ सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी तालुक्यातील धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला दौलावडगाव जवळ वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली.…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची…

  • पालकमंत्री मुंडेंचा पाठपुरावा, अग्रीम न देण्याचे कंपनीचे अपील फेटाळले !

    पालकमंत्री मुंडेंचा पाठपुरावा, अग्रीम न देण्याचे कंपनीचे अपील फेटाळले !

    मुंबई -बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण आग्रही भूमिकेला यश येताना दिसत असून, बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावली आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात…

  • डॉ थोरात यांना पदोन्नती ! मुंबईत सहायक संचालक !!

    डॉ थोरात यांना पदोन्नती ! मुंबईत सहायक संचालक !!

    बीड- नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना सहायक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.सहायक संचालक एसटीडी एड्स मुंबई येथे त्यांची बदली झाली आहे तर त्यांच्या जागी डॉ चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नाव मिळवलेले आणि सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात असलेले डॉ अशोक थोरात यांची सहायक…

  • बीडमधील मल्टिस्टेट मध्ये ठेवी ठेवणारे गडाचे महाराज,देवस्थानचे ट्रस्टी हैराण !

    बीडमधील मल्टिस्टेट मध्ये ठेवी ठेवणारे गडाचे महाराज,देवस्थानचे ट्रस्टी हैराण !

    बीड- छत्रपती संभाजी नगर असो की बीड अथवा परभणी या ठिकाणच्या पतसंस्था अचानक बुडाल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.अशातच शहरातील अनेक मल्टिस्टेट मध्ये वेगवेगळ्या गड आणि देवस्थानचे कोट्यवधी रुपये अडकल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.आता हे पैसे परत मिळवायचे कसे असा प्रश्न येथील महाराज आणि ट्रस्टी समोर निर्माण झाला आहे. आदर्श पतसंस्था असो की जिजाऊ मा…

Exit mobile version