News & View

ताज्या घडामोडी

chhatrapati sambhajinagar news

बीडच्या भामट्यांनी बनावट दस्तऐवज तयार करून केली जमिनीची विक्री!दोघांना अटक!

छत्रपती संभाजीनगर -शेख हुसेन शेख मोहम्मद आणि इलियास फारुकी या बीडच्या दोन भामट्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुंबई हायवे लगत असलेली जमीन खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या दोन्ही भामट्याना अटक केली आहे. या दोघांनी यापूर्वी गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग सहित अनेक ठिकाणी इनामी जमीन, औकाफ जमीन प्रकरणात कुटाणे केले आहेत.
न्यू एसबीए कॉलनी, ज्योतीनगर येथील रहिवासी अर्पणा सतीश मुंदडा (वय ५९) यांच्या वडिलांची मुंबई हायवे रोडलगत गट क्रमांक १०९ मध्ये मौल्यवान जमीन आहे.
या जमिनीवर आरोपींची नजर होती. त्यांनी संगनमत करून फिर्यादीचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसताना आणि त्या अनुपस्थित असताना खोट्या सह्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे बेकायदेशीर दस्त तयार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शेख हुसेन शेख मोहम्मद फरदुस उर्फ शब्बीर गुलाम अब्बास युसुफ आणि बनावट आधार कार्ड तयार करून देणारा इलीयस फारुकी या दोघांचा समावेश आहे. दोघेही बीड येथील रहिवासी आहेत. त्यांना बीडमधून ताब्यात घेण्यात आले असून, गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

केवळ बनावट दस्त तयार करून आरोपी थांबले नाहीत, तर जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी थेट बुलडोझर आणण्यात आला. जमिनीवरील साहित्य नष्ट करून बळजबरीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अर्पणा मुंदडा यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३४०(२), ३२९(३), ३३६(३), ६१(२) आणि ३(५) अंतर्गत फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version