News & View

ताज्या घडामोडी

pudhari import wp content uploads 2022 07 6 5 1

शिक्षण विभागाकडून कोंबड झाकायचा प्रयत्न!

बीड -जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी काढून तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून नोकरी मिळवणाऱ्या 73 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश पाच दिवसापूर्वी शिक्षण उपसंचालक यांनी दिले. मात्र यात कोण कोण आहेत याची माहिती तक्रारदार सादेक इनामदार अथवा पत्रकारांना देण्यास उपसंचालक,शिक्षणाधिकारी आणि पे युनिट च्या अधीक्षक यांनी टाळाटाळ सुरु केली आहे. हा प्रकार म्हणजे कोंबड झाकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. कारवाईची माहिती लपवून हे अधिकारी नेमकं शिक्षक आणि संस्थाचालक यांना का पाठीशी घालत आहेत असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

बीड जिल्ह्यात 73 शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश मागील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर चे उपसंचालक कैलास दातखीळ यांनी दिले. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

यामध्ये जिल्ह्यातील नेमके कोण कोणत्या संस्थेचे शिक्षक आहेत याची माहिती पत्रकार, तक्रारदार यांच्यापासून जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न केला जातं आहे. तक्रारदार सादेक इनामदार यांनी उपसंचालक यांच्यापासून ते शिक्षण विभागापर्यंत सर्वांशी संपर्क केला.

मात्र त्यांना तसेच पत्रकारांना देखील माहिती दिली गेली नाही. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अभिजित भेंडेकर, माध्यमिक च्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे, बहिर तसेच पे युनिट चे अधीक्षक राजेश खटावकर आणि ढाकणे यांनी ही माहिती जाणीवपूर्वक लपवली.

हा प्रकार म्हणजे दोषी शिक्षक आणि शिक्षण संस्था चालक यांना पाठीशी घालण्याचा उद्योग आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मूळ तक्रारदार सादेक इनामदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version