बीड –उमेद कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक शकील शेख यांच्या विरुद्ध महिलांना जाणीवपूर्वक त्रास देणे, अपमानित करणे व विनयभंग करणे या सारख्या गंभीर तक्रारी असताना सुद्धा बीडचे सिइओ जितीन रहेमान हे शेख यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत एप्रिल ते ऑगस्ट या चार पाच महिन्यात ग्रामविकास विभागाने पाच ते सहा वेळा अहवाल पाठवण्याबाबत स्मरण पत्र दिले. मात्र सिइओ यांनी या पत्राना केराची टोपली दाखवली आहे.
एप्रिल 2026 मध्ये शकील शेख यांच्याविरुद्ध काही महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली ज्यामध्ये शेख हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तालुकास्तरावरून आपल्याला बोलवून घेत आपल्याशी लगट करण्याचा तसेच अत्यंत घाणेरडे इशारे तरुण त्रास देण्याचा प्रकार करतात अशी तक्रार केलेली आहे.
2018 पासून बीडच्या उमेद कार्यालयात कंत्राटी म्हणून कामाला असलेल्या शकील शेख याच्या विरुद्ध अनेक तक्रारी झालेल्या आहेत. मात्र एप्रिल 2026 मध्ये काही महिलांनी गंभीर तक्रार केली, याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली तसेच ग्रामविकास विभागाने देखील शेख यांची चौकशी करण्याचे आदेश दिले.
परंतु शेख यांच्यावर काय कारवाई केली याचा अहवाल एप्रिल पासून आतापर्यंत ग्रामविकास विभागाला पाठवण्यात आलेला नाही. पाच ते सहा वेळा स्मरण पत्र देऊन देखील सिइओ जितीन रहमान कोणत्या नाजूक कारणामुळे शेख यांना पाठीशी घालत आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.





Leave a Reply Cancel reply