News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १० ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी . ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/५५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक १० आँगस्ट २०२६‼️

मेष: हितशत्रुंना ओळखून कामाचे नियोजन करा. यश विलंबाने मिळेल. ध्यान प्राणायाम करून मनाची प्रसन्नता वाढवा. आनंदी दिवस आहे.

वृषभ: नियमित व नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. कुटुंबात ऐक्य आणि सौहार्दपूर्ण भावना वाढेल. मित्र भागिदार सहकार्य करतील पूर्ण विश्वासून मात्र राहू नये.

मिथुन: नव्या ओळखी होतील. नविन कामे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नविन उपक्रम राबवण्यासाठी उत्तम काळ. घरात आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

कर्क: अनावश्यक खर्च टाळावा. मन प्रसन्न राहील. घरातील प्रसन्न वातावरणामुळे छंद जपण्यासाठी चांगला दिवस आहे. आत्मिक समाधान मिळेल.

सिंह: मित्र सहकारी यांचेकडून सहकार्य मिळेल. आपल्या कामातून समाजात प्रतिष्ठा वाढेल. नियोजित कार्यक्षेत्रात यश मिळवाल. आनंदी दिवस आहे.

कन्या: मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्याने प्रसन्नता वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसाय व शिक्षणात यश मिळेल. ध्यान धारणा प्राणायाम करा.

तूळ: नविन जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्ट्या करार लाभदायक होतील. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. मित्र व कुटुंबीय यांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक: चांगला दिवस आहे. जोडीदारासोबत संवादाने नियोजित कार्य संपादन कराल. भागीदारीतील निर्णय अनुकूल होईल. कौशल्यपूर्ण कामामुळे प्रतिष्ठा वाढेल.

धनु: मनाची चंचलता व नकारात्मकता यामुळे थोडे उदास वाटेल. आरोग्याची थोडी काळजी घ्या. कामात सातत्य व सकारात्मकता वाढवावी स्थिती सुधारेल. अध्यात्मिक धार्मिक कार्यात भाग घ्यावा.

मकर: आनंदाचा दिवस आहे. अभ्यासपूर्ण तयारी कराल. त्यामुळे चांगले यश मिळेल. मुलांच्या संबंधित शुभ बातमी मिळेल. आर्थिक कामे मार्गी लागतील.

कुंभ: उत्साह वाढविणारा आनंदी दिवस आहे. घरगुती वातावरणात चांगले असेल. कौटुंबिक संवाद महत्वाचा असेल. स्थावर मालमत्तेचे काम पुढे सरकेल. मित्र नातेवाईकांच्या भेटी होतील.

मीन: चांगला दिवस आहे. कामामध्ये व्यस्त राहाल. आर्थिक कामे समाधानकारक होतील. सकारात्मकतेने कार्य संपादन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version