बीड -जिल्हा कारागृहात एका कैद्याचा हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
चेक बाउन्स च्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका पन्नास वर्षीय कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला… गणेश पवार असे या कैद्याचे नाव असून आठ दिवसापूर्वी त्याला कारागृहात आणण्यात आले होते.
शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याला छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने याबाबतची माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली.. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान यानंतर आता जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आलेला आहे.





Leave a Reply Cancel reply