बीड –अरे तुला जी आर तरी कळतो का? असं म्हणत या बिनडोकच्या नादाला लागू नका असा ईशारा राज्याचे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांचे नाव नं घेता त्यांना दिला. मुंडे यांनी आक्रमक भाषण करत आमच्या ताटातलं घ्याल तर आम्ही गप्प बसणार नाही असे म्हटले.
बीड येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी आक्रमक भाषण केले. व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ, आ गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, यांच्यासह ओबीसी नेते हजर होते.
मुंडे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाषण करताना मनोज जरांगे यांचे नाव नं घेता टीका केली. त्याने मुख्यमंत्री यांची आयमाय काढली. आम्हाला तर पाडायला निघाले होते. पण मी एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आलो.
माझा डोळा गेला म्हणून टीका केली असं म्हणत त्यांनी गॉगल काढून दाखवत हे बघ माझा डोळा ठीक आहे, फक्त थोडा फडफडतो आहे, जास्त फडफडला तर अवघड होईल असा ईशारा दिला.
ते बिनडोक जी आर बद्दल बोलत आहे, त्याला जी आर तरी कळतो का? असा सवाल करीत मुंडे यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही अन मिळू दिलं जाणार नाही असं म्हटलं.












Leave a Reply