News & View

ताज्या घडामोडी

sarkarnama 2021 10 4432bc43 84b7 48f3 b114 ef383f338bd9 Sarkarnama 2021 10 28T180901 350

बीडचे तहसीलदार शेळके अडचणीत!वाळू माफियावरील दंड माफी केल्याप्रकरणी चौकशी सुरु!

बीड – बीडचे विद्यमान तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे त्यासोबतच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंबड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना शेळके यांनी संजय कटारे याच्यावर लावलेला वाळू चोरी प्रकरणातील चार कोटी 90 लाख रुपयांचा दंड माफ केला होता आता हे प्रकरण पुन्हा नव्याने चौकशीसाठी समोर आले असून शेळके यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे यामुळे तहसीलदार शेळके अडचणीत आले आहेत हे नक्की.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातून सुमारे २ हजार ब्रास अवैध वाळूचे उत्खनन झाल्याचे हे प्रकरण आहे.मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असणारे संजय कटारे यांनी हे अवैध उत्खनन केले होते.

या अवैध वाळू उपशाप्रकरणी महसूल विभागाने एप्रिल २०२३ मध्ये एकूण १८ जणांवर दंडात्मक कारवाई केली होती. यामध्ये ४ कोटी ९० लाखांपेक्षा जास्त दंडाचा समावेश होता.

या कारवाईनंतर, संजय कटारे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर तत्कालीन तहसीलदारांनी रहस्यमयी पद्धतीने कटारे यांचे नाव या दंडाच्या कारवाईतून वगळले (माफ केले) होते.

या निर्णयाविरोधात अजय महाराज बारस्कर यांनी आक्षेप घेत थेट महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.अंबडचे उपविभागीय अधिकारी (SDO) उमाकांत पारधी यांनी तत्कालीन तहसीलदारांचा तो निर्णय बेकायदेशीर ठरवत रद्द केला आहे. प्रशासनाने संजय कटारे यांच्यावरील ४.९० कोटींचा मूळ दंड पुन्हा कायम केला असून, ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version