मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांनी देखील शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती.मात्र त्यांच्याऐवजी सोनवणे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाले.
- आजचे राशीभविष्य!
- दीड महिना झाला तरी वाळू चोरीतील तलाठी मंडळ अधिकारी पोलिसांना सापडेनात!
- आजचे राशीभविष्य!
- एटीएस चे माजलगावात छापे!
- एकही बी एल ओ घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करेना!प्रशासनाचे दुर्लक्ष!
त्यानंतर मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्यात आली होती,परंतु त्यांनी नकार दिला,त्यामुळे हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगे यांच्या उमेदवारीमुळे बीड मतदारसंघात आता तिरंगी फाईट होणार आहे.





Leave a Reply Cancel reply