मुंबई- बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांना देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसंग्राम च्या प्रमुख ज्योती मेटे यांनी देखील शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती.मात्र त्यांच्याऐवजी सोनवणे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाले.
- आजचे राशीभविष्य!
- पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!
- आजचे राशीभविष्य!
- खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!
- संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी :बोरगाव च्या शाळेचा प्रताप!
त्यानंतर मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्यात आली होती,परंतु त्यांनी नकार दिला,त्यामुळे हिंगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगे यांच्या उमेदवारीमुळे बीड मतदारसंघात आता तिरंगी फाईट होणार आहे.



Leave a Reply