मुंबई – गेल्या दहा महिन्यापासून लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर या ग्रामपंचायत मध्ये मतदान होणार आहे.
राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी केली.
मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
- आजचे राशीभविष्य!
- पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!
- आजचे राशीभविष्य!
- खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!
- संचमान्यतेसाठी बोगस विद्यार्थी :बोरगाव च्या शाळेचा प्रताप!
5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.



Leave a Reply Cancel reply