बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बीड जिल्ह्यात बट्याबोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ऐवजी त्यांचे लाड होऊ लागले आहेत.आपल्या मुलाला अन नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कामे देऊन गुत्तेदारी करणाऱ्या एम आर लाड कडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज देऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने नेमकं काय साध्य केलं आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ अजित पवार,जिल्हा दक्षता प्रमुख नामदेव उबाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे,शिवाजी चव्हाण आणि एम आर लाड यांनी जल जीवन मिशन योजनेचे वाटोळे केले.
चव्हाण असोत की लाड यांनी आपल्या मुलाला,मुलीला अन नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केली. हे करताना प्रक्रिया बोगस केली गेली.केंद्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी अशा या योजनेसाठी प्राधान्य द्यावे असे निर्देश दिल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यात हैदोस घातला.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील यांत्रिक विभागाचे उप अभियंता एम आर लाड यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची कामे दिली.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लाड यांचयावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली.
मात्र अद्यापपर्यंत त्यावर काहीच झालेलं नाही.कदाचित लाड यांनी आपल्यावरील कारवाई मॅनेज केली असावी.दरम्यान सीईओ पवार यांची बदली झाल्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर लाड यांची नियुक्ती केली आहे.
ज्या व्यक्तिविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे त्याच्यावरच मोठी जबाबदारी देऊन जिल्हा परिषदेचे प्रशासन नेमकं काय साध्य करू इच्छित आहे अशी चर्चा होऊ लागली आहे.
Leave a Reply