News & View

ताज्या घडामोडी

f20143ea 0612 41a1 9181 d37890fbde07

पवारांनी काढली काकूंची आठवण अन केले आ संदिप क्षीरसागर यांचे कौतुक !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण काढत नातू आ संदिप क्षीरसागर यांचे तोंडभरून कौतुक केले. निष्ठा काय असते हे संदिप ने दाखवून दिले अस म्हणत पवारांनी आ क्षीरसागर यांची पाठ थोपटली .

बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जंगी स्वागत झाले.बीड शहरात ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

या सभेत बोलताना शरद पवार यांनी माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण सांगितली.1980 च्या काळात आपल्यासोबत केशरकाकू होत्या,त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पदाला काही लोकांनी अडचणी निर्माण केल्या,त्यावेळी राजकीय कारकीर्दीचा विचार न करता केशरकाकू आपल्यासोबत राहिल्या.आज त्यांचा नातू संदिप क्षीरसागर यांनी आपल्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

0abc954c 7c2a 4e7e 8086 8fa4bfea983e6962686640703694660

संदिप याने निष्ठा काय असते हे आज दाखवून दिले,आज ते जिल्ह्याचे ओबीसी नेते आहेत अस म्हणत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *