News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…

  • अंतरवली दगडफेक प्रकरणाचे गेवराई कनेक्शन !चौघांना अटक !

    जालना- अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.या दगडफेकीचे कनेक्शन थेट गेवराई पर्यंत पोहचले असून बेदरे सह चार जण पोलिसांनी अटक केले आहेत.आरोपीकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली…

  • जाळपोळ,दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार !स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांच्या तपासावर संशय !!

    बीड- बीड शहरासह जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी 250 पेक्षा अधिक आरोपीना अटक केली असली तरी अद्यापही गोरख शिंदे सारख्या म्होरक्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.स्थानिक गुन्हे शाखेवर मोठी जबाबदारी असताना त्यांची दोन पथके अन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा कारभार म्हणजे मला पहा अन फुल वहा असा झाला…

  • पतसंस्थेच्या पैशातून उभारलेला गूळ कारखाना अडचणीत ! शेतकरी हवालदिल !

    बीड- मुनीम,पिग्मी एजंट ते पतसंस्थेचा अन गूळ कारखान्याचा मालक हा साईनाथ परभने यांचा प्रवास थक्क करणारा आहे.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशातून त्यांनी हिरापूर आणि गुळज या ठिकाणी गूळ कारखाने काढले मात्र त्या धंद्यात तोटा आल्याने पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या झोपेत धोंडा घालण्याचे काम त्यांचाकडुन झाले आहे.जो माणूस ठेवीदारांचे पैसे वेळेत देऊ शकत नाही तो आपल्या उसाचे…

  • कौमच्या पत्रकारांसोबत मिलियाच्या ट्रस्टीची बैठक !

    बीड- गेल्या चार पाच वर्षांपासून आपल्या संस्थेतील एका सेक्सरॅकेट मध्ये सहभागी असलेल्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन मीडियामध्ये बोंबाबोंब झाल्यानंतर जागे झालेल्या मिलिया च्या ट्रस्टीनी बुधवारी मुस्लिम समाजातील काही पत्रकारांसोबत सचिवांच्या घरी बैठक घेतली.कौम का मामला है,हमे मदत करो अस म्हणत उपस्थित पत्रकारांना आपली बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीड शहरातील…

  • लोकांच्या ठेवी कधी अन किती द्यायच्या याचा अधिकार पतसंस्था चालकांना कोणी दिला !

    बीड- सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा जर एखाद्या मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत ठेवला तर तो कधी काढायचा अन कधी नाही याचा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे.त्याला गरज लागेल तेव्हा तो हवे तेव्हढे पैसे काढू शकतो,त्याला सर्व्हिस देणं हे त्या संस्थेचे कर्तव्य आहे.मात्र गेवराईच्या काही पतसंस्था मालकांनी यापुढे एका ठेवीदाराला दररोज प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय…

  • जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जागा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हालचाली !

    बीड- बीड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली म्हणजेच ग्रामविकास विभागाकडे असलेली पंचायत समिती बीडची जागा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.याबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ यांना जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.विशेष बाब म्हणजे सदरील जागा हस्तांतरित करण्याचे अधिकार सीईओ यांना नसताना हे पत्र त्यांना पाठवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे….

  • ठेवीदार अन गडाच्या पैशातून उभारले कारखाने ! मल्टिस्टेट च्या व्यवहारावर संशय !!

    बीड- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था अचानक बंद होऊ लागल्या आहेत,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदार मात्र भिकेला लागत आहेत.जिजाऊ माँ साहेब, ज्ञानराधा नंतर मंगळवारी साईराम अर्बन बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील आणखी एक मल्टिस्टेट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील काही गडाचे कोट्यवधी रुपये आहेत,हे पैसे या…

  • साईराम अर्बन ला कुलूप ! ठेवीदारांची गर्दी !परभने स्टील सुद्धा बंद झाल्याने खळबळ !!

    बीड- बीड शहरासह जिल्ह्यात तब्बल वीस शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. साईराम चे मालक शाहिनाथ परभने यांच्या मालकीचे परभने स्टील हे दुकान देखील बंद असून त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ…

  • सहायक कार्यक्रम अधिकारी असणारे शेळके एक दिवसही कार्यालयाकडे फिरकले नाहीत !

    बीड- समग्र शिक्षा अभियान कार्यालयामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून बेकायदेशीरपणे रुजू झालेले ऋषिकेश शेळके यांनी एकही दिवस कार्यालयात बसून किंवा जिल्हाभर फिरून आपले कर्तव्य पार पाडले नाही उलट शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे फिरत आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानली अशा शेळकेंना कुलकर्णी का पाठीशी घालत आहेत हे न उलगडणारे कोडे…