News & View

ताज्या घडामोडी

सहायक कार्यक्रम अधिकारी असणारे शेळके एक दिवसही कार्यालयाकडे फिरकले नाहीत !

बीड- समग्र शिक्षा अभियान कार्यालयामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून बेकायदेशीरपणे रुजू झालेले ऋषिकेश शेळके यांनी एकही दिवस कार्यालयात बसून किंवा जिल्हाभर फिरून आपले कर्तव्य पार पाडले नाही उलट शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे फिरत आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानली अशा शेळकेंना कुलकर्णी का पाठीशी घालत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे

मूळ पाटोदा येथे नोकरीस असलेले ऋषिकेश शेळके यांनी देवाण-घेवाण करत बीडच्या समग्र शिक्षा अभियान कार्यालयात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती मिळवली जी बेकायदेशीर आहे बीडच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती अथवा नियुक्ती करावयाचे असल्यास चार ते पाच शिक्षण विस्तार अधिकारी उपलब्ध असताना शेळकेंवर विशेष प्रेम दाखवण्यात आले त्या पाठीमागे लक्ष्मी दर्शनाचा लाभ होता का अशी चर्चा सुरू आहे

दरम्यान समग्र शिक्षा अभियान कार्यालयात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून श्रीमती गंगाखेडकर आणि ऋषिकेश शेळके या दोघांची नियुक्ती केलेली आहे शासनाच्या अध्यादेशानुसार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी असलेल्या व्यक्तीने एक महिन्यात गट साधन केंद्रांना तीन वेळा भेटी देणे ,समूह साधन केंद्रांना पाच वेळा भेटी देणे ,प्राथमिक शाळांना भेटी देणे वस्ती शाळांना भेटी देणे ,केंद्रीय पातळीवर बैठक घेणे, ग्रामशिक्षण समितीच्या बैठका घेऊन आढावा घेणे हे काम करणे अपेक्षित आहे.

मात्र समग्र शिक्षा अभियान कार्यालयात रुजू झालेल्या दिवसापासून आजपर्यंत एकही दिवस शेळके यांनी आपले कर्तव्य पार पाडलेले नाही ते शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्यासोबत स्काऊट भावनात किंवा त्यांच्या खाजगी संस्थेच्या कार्यालयात बसून नको ते व्यवहार आणि उद्योग करतात अशी चर्चा आहे या शेळके महाशयांनी सरकारी नोकरीत असताना देखील बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वतःचे शिक्षण संस्थांचे जाळे उभा केलेले आहे तसेच मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील गोळा केल्याची चर्चा असून याबाबत लाचलुचपत विभागाकडे लवकरच तक्रार केली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *