News & View

ताज्या घडामोडी

Tag: #नरेंद्र मोदी

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….

  • भाजपसोबत निवडणूक जिंकली अन खुर्ची साठी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती- फडणवीस !

    मुंबई- भाजपसोबत निवडणूक लढवली अन खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,या निकालाबद्दल अधिक पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोक…

  • शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…

  • शिंदे सरकार वाचलं !राज्यपाल,फडणवीस यांच्यावर ताशेरे !!

    नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवी तारीख मिळणार हे नक्की झालंय. सरकारवरील संकट यामुळे काही काळासाठी टळलं आहे हे नक्की.शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे हे नक्की….

  • कर्नाटकात भाजपला धक्का बसणार !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.एक्झिट पोल नुसार काँग्रेस सर्वाधिक जागा घेऊन सत्ता स्थापनेच्या समीप पोहचेल अस दिसतंय.देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष पुन्हा एकदा किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार…

  • शिंदे विरुद्ध ठाकरे ! उद्या फैसला !!

    नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी लागेल अशी माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी नेमका काय निकाल येतो याकडे लागले आहे जून 2022 मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड करत तब्बल…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर रजेवर !

    बीड- विधानपरिषद आ सुरेश धस यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर हे अचानक रजेवर गेले आहेत.धस यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता जेजुरकर हे रजेवर गेल्याने या वादाला अधिक तोंड फुटले आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा…

  • उद्योगपती नरेश गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा !

    नवी दिल्ली- जेट एअरवेजचे संस्थापक तथा भारतातील बडे उद्योगपती नरेश गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सीबीआय ने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल…

  • पवारांचा यु टर्न !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली दोन मे रोजी आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच…