News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • भगवान गडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला -पंकजा मुंडे!

    भगवान गडावरील दसरा मेळावा हिरावून घेतला -पंकजा मुंडे!

    सावरगाव -भगवान भक्तिगड येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच झापले. तुम्ही असं वागणार असाल तर मला कठोर व्हावे लागेल. हुल्लडबाजी करणारे माझे लोक असू शकतं नाहीत. अगोदर भगवान गडावरील माझा मेळावा हिरावून घेतला. आता येथील मेळावा देखील तुम्हाला बंद पाडायचा का असा सवाल करते मुंडे यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. सावरगाव येथे…

  • बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड ओबीसी साठी राखीव!

    बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…

  • आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!

    आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!

    बीड –बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार संदीप क्षीरसागर यांची राज्य शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट )सदस्यपदि नियुक्ती झाली आहे. आ क्षीरसागर यांनी आज या नियुक्तीनंतर विदयापीठाच्या बैठकीत सहभाग घेतला. मराठवाड्यातील प्रतीथयश अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठवर सिनेट मेंबर ची नियुक्ती राज्यशासनाच्या वतीने केली जाते.विधानसभा प्रतिनिधी म्हणून त्यांची शासनाने ही नियुक्ती…

  • अर्चना कुटेच्या पोलीस कोठडीत वाढ!

    अर्चना कुटेच्या पोलीस कोठडीत वाढ!

    बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत दिन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांच्यासह उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी पुण्यातून सुरेश कुटे यांच्यासोबत बीडच्या एसपी ऑफिस मध्ये…

  • माने कॉम्प्लेक्स समोर युवकाचा मर्डर!

    माने कॉम्प्लेक्स समोर युवकाचा मर्डर!

    बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करत मर्डर करण्यात आला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे. माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी यश ढाका या युवकांवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने…

  • गणेशोत्सव स्पर्धेत बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास तृतीय पुरस्कार!

    गणेशोत्सव स्पर्धेत बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास तृतीय पुरस्कार!

    बीड – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य आणि जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार धारूर, द्वितीय अंबाजोगाई आणि तृतीय पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेश मंडळासाठी विविध पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्य, सामाजिक जनजागृती या विषयावर देखावे सादर…

  • कंकालेश्वर मंदिरासाठी नऊ कोटींचा निधी!

    कंकालेश्वर मंदिरासाठी नऊ कोटींचा निधी!

    बीड – कंकालेश्वर मंदिर, ता.जि.बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपण्ण हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील शासन निर्णय सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने आज जारी केला आहे.संचालक, पुरातत्व…

  • जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!

    बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…

  • सर्व शाळांना सुट्टी!

    सर्व शाळांना सुट्टी!

    बीड-बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी मुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दि. 23.09.2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.…

  • टचप काढायला मि येतो!अजित दादांनी अधिकारी, गुत्तेदाराला झाप झाप झापलं!

    टचप काढायला मि येतो!अजित दादांनी अधिकारी, गुत्तेदाराला झाप झाप झापलं!

    बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे आणि तोंडावर चुका काढून झापण्याच्या शैलीमुळे सर्वत्र परिचित आहेत. याचा अनुभव बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच गुत्तेदारांना आला. जिल्हा रुग्णालयातील कॅथ लॅब च्या उदघाट्न प्रसंगी आला.दरवाजाला लावलेले स्क्रू वेगवेगळे का आहेत,वर्क अंडर प्रोसेस आहे तर उदघाट्नला कशाला बोलावले,…

Exit mobile version