बीड -राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांवर लिंकिंग च्या नावाखाली कंपन्याकडून केली जाणार दडपशाही तसेच अप्रामाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासंह इतर मागण्यांसाठी राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे.
विशेषतः देशातील सर्व राज्य आज एक दिवसाचा सांकेतिक बंद ठेवून महाराष्ट्राच्या बंदला पाठिंबा दिला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय नाही
विक्रेते व शेतकरी दोघांनाही तोटा होतं आहे.अन्यायकारक व अव्यवहार्य नियमांमुळे व्यवसायावर परिणाम होतं आहे.खत लिंकिंगमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतं आहे.अप्रमाणित HTBT बियाण्यांमुळे आर्थिक नुकसान होतं आहे.सीलबंद वस्तूंमध्ये दोष असतानाही विक्रेत्यांना आरोपी ठरवणे हा अन्याय आहे.तपासणी व प्रशासनातील अतिरेकी हस्तक्षेप कमी करून कंपन्यांची जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती बंद करावी.
लिंकिंग पूर्णतः बंद करण्यात यावे,अप्रमाणित बियाण्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,विक्रेत्यांना आरोपी नव्हे तर साक्षीदार दर्जा देण्यात यावा,तपासणी अधिसूचना रद्द,साथी पोर्टल सक्ती रद्द,FOR पद्धतीने पुरवठा व मार्जिन वाढ,सॅम्पल थकीत रक्कम शासनाकडून मिळावी,युरिया-DAP वितरणाचा फेरविचार करावा,मुदतबाह्य औषधे कंपन्यांनी परत घ्यावीत
अवैध उत्पादनांवर बंदी,नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्यांतील जाचक अटी शिथिल करणे,हवामान नुकसानासाठी विक्रेते जबाबदार नाहीत,
हा बंद शेतकरी हितासाठी आहे
बाजारातील पारदर्शकता व न्याय्य व्यवस्था हवी
विक्रेते दोषी नसताना त्यांच्यावर अन्याय थांबवावा,शासनाला मागणी
तात्काळ चर्चेसाठी पुढाकार घ्यावा
खरिप २०२६ पूर्वी निर्णय घ्यावेत
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा ईशारा संघटनेने दिला आहे.
राज्यभर एकजुटीने बंद यशस्वी करण्याचा निर्धार,शेवटचा संदेश
हा लढा केवळ विक्रेत्यांचा नाही, तर शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अंगद नवले आणि सचिव जयकिशोर बियाणी यांनी केले आहे.





Leave a Reply Cancel reply