Category: महाराष्ट्र
-
पुणे,नांदेड,छत्रपती संभाजी नगर ला फ्लॅट,हॉटेल ! रामोड ने गोळा केली करोडोची माया !!
पुणे- भूसंपादन चा मोबदला मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.छत्रपती संभाजी नगर,पुणे येथे फ्लॅट,हॉटेल आणि नांदेड येथे शेतजमीन अशी किमान पन्नास कोटींपेक्षा अधिकची माया जमवली असल्याचे उघड झाले आहे.पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्यावरही अनेक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. मुळचे नांदेडचे असलेले…
-
सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…
-
राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!
बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…
-
पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !
बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…
-
दिड लाख विद्यार्थ्यांना मिळणार आयटीआय मध्ये प्रवेश !
बीड- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन अर्थात आयटीआय मध्ये प्रवेश घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.राज्यभरात यावर्षी आयटीआय मध्ये वेगवेगळ्या ट्रेड च्या दीड लाख जागांवर हे प्रवेश दिले जाणार आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आयटीआय मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन…
-
मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !
बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील एकूण दोन हजार…
-
ऑगस्ट मध्ये होणार तलाठी भरती !
बीड- महसूल विभागात येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मेगा भरती होणार आहे.चार हजार पेकशा जास्त तलाठी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. राज्यात 4625 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट…
-
पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट ! नाराजी बोलून दाखवणार !!
परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप…
-
पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!
बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात…
-
राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !
बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…