News & View

ताज्या घडामोडी

ऑगस्ट मध्ये होणार तलाठी भरती !

बीड- महसूल विभागात येत्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मेगा भरती होणार आहे.चार हजार पेकशा जास्त तलाठी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

राज्यात 4625 जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आदेशात देण्यात आली आहे. भरतीची जाहिरात आल्यामुळे या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने यावर्षी जून ते 15 ऑगस्ट दरम्यान हजारो रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 43 विविध खात्यांतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट पूर्वी ही पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे.

राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने याबाबतचा एक आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील रिक्त असलेल्या 4 हजार 625 तलाठी पदांच्या जागा येत्या 17 ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी क- संवर्गातील 4 हजार 625 रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 तलाठी पदाच्या भरतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करून भरायचे आहेत. याबाबतची जाहिरात शासनाच्या या https://mahabhumi.gov.in/mahabhumilink लिंक वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *