News & View

ताज्या घडामोडी

Category: क्राईम

  • गाडी सोडण्यासाठी पंचवीस हजार!शिवाजीनगर पोलिसाचा प्रताप!!

    गाडी सोडण्यासाठी पंचवीस हजार!शिवाजीनगर पोलिसाचा प्रताप!!

    बीड -राजकीय पुढारी अन पोलीस यांचे मधुर संबंध यावर राज्यात मोठी चर्चा चालू असताना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने लायसन नसलेली गाडी सोडण्यासाठी चक्क पंचवीस हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. आता यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती वाटा मिळाला हे त्यांनाच माहित. बीडचे पोलीस दल सध्या संपूर्ण राज्यात बदनाम झाले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या…

  • घुले,सांगळे सरेंडर?

    घुले,सांगळे सरेंडर?

    पुणे -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनी पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, आंधळे व इतरांनी अमानुष पद्धतीने ही हत्या केली होती. या…

  • गोळीबार प्रकरण, तीन आरोपी जेरबंद!

    गोळीबार प्रकरण, तीन आरोपी जेरबंद!

    बीड -शहरातील बार्शी नाका भागात असलेल्या प्रकाश आंबेडकर नगर मध्ये गोळीबार करून फरार झालेल्या तीन आरोपीना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. बीड शहरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या विश्वास डोंगरे याच्या घरी जाऊन अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि इतरांनी बेधुंद गोळीबार केला होता. यांध्ये डोंगरे हे जखमी झाले होते. या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा…

  • फरार विष्णू चाटे जेरबंद!

    फरार विष्णू चाटे जेरबंद!

    बीड -मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपीना अटक झाली आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ता. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खुन झाला होता. नवव्या दिवशी फरारी चाटेला…

  • बीडमध्ये गोळीबार, एक जण जखमी!

    बीडमध्ये गोळीबार, एक जण जखमी!

    बीड -जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेचे तिनेतेरा वाजले असताना पेठ बीड भागात रात्री उशीरा झालेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अक्षय आठवले याने विश्वास डोंगरे याच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. जखमीला छत्रपती संभाजीनगर ला उपचारासाठी हालवण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात पोलीस आहेत कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परळीतील व्यापारी अमोल…

  • वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल!

    वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल!

    केज- वाल्मिक कराड यांच्या सह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचेअपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व मस्साजोग…

  • वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!

    मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच…

  • देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!

    बीड -पवनचक्की च्या वादातुन निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलम्बनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी…

  • परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!

    परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…

  • सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!

    सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!

    केज -तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. या घटनेने मसाजोग मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊनअज्ञात व्यक्तीनी…