News & View

ताज्या घडामोडी

पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!

बीड -सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.

बीड जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात सर्रास पैशाची देवाणघेवाण होते. विशेषतः प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागात लाखो रुपयांची उलाढाल बिनबोभाटपणे होते. सेवानिवृत्त शिक्षकांची फाईल असो कि मागील काळातील अप्रूव्हल काढणे ही सगळी कामे पैशाशिवाय होतच नाहीत.

माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाचे काम मंजूर करण्यासाठी संतोष कुडके यांनी नव्वद हजार रुपयांची मागणी केली होती. यातील चाळीस हजार रुपये घेतले, उर्वरित पन्नास हजार रुपये स्वीकारताना बुधवारी कार्यालयात अटक केली.

माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोरी यामुळे चर्चेत आली आहे. या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विस्तार अधिकारी असणारे हजारे असोत कि काकडे हे डेपोडेशन वर कार्यरत आहेत. तर शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे हे देखील फाईल वर वजन ठेवल्याशिवाय काम करत नाहीत असे आरोप अनेकदा झाले आहेत.

माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण 2012 पूर्वीचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या ऑर्डर काढण्यासाठी किमान पाच ते पंचवीस लाखाचा रेट आहे. त्या काळात कार्यरत असणाऱ्या शिक्षणाधिकारी यांच्या घरी जाऊन सह्या घेण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे काही रजिस्टर हे अधिकाऱ्यांच्या घरी आहेत, तेथेच पैसे घेऊन काम केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *