News & View

ताज्या घडामोडी

ambhora police station 2023 11 5085682efa18b3802cf6548113a7c13a 3x2 1

आष्टीत भीषण हत्याकांड!

आष्टी -आष्टी तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाहिरा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन भावावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या भावाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.

अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे.आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *