Category: अंबाजोगाई
-

बीड ओबीसी साठी राखीव!
बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…
-

जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!
बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…
-

बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू!
अंबाजोगाई -येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नोकरीस असलेल्या विजयमाला सरवदे यांचा बसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असणाऱ्या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. केज येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि गेल्या ३५ वर्षांपासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय…
-

शिक्षक पतसंस्था घोटाळ्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल!
बीड- सव्वा दोन कोटी रूपयांच्या अपहारात अखेर पंधरा घोटाळेबाज अडकले आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पंधरा घोटाळेबाजांमध्ये अंबाजोगाई डीसीसी बँकेच्या दहा जणांचा समावेश आहे. या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार सानेगुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम हा आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी…
-

जिलेटिनच्या स्फ़ोटात कामगारांचा मृत्यू!
अंबाजोगाई – तालुक्यातील तळेगांव घाट शिवारात एका शेतकर्याच्या शेतामध्ये वैयक्तीक जलसिंचन विहीरीचे काम सुरू होते. या कामावर ब्लास्टींग करतांना जिलेटीणचा स्फोट झाल्याने एक कामगार ५० फुट विहीरीच्या बाहेर येवून परत विहीरीत पडला. याचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य तीघेजन जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वा.रा.ति. रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवारी…
-

दुरावलेला संजय धनंजय च्या साथीला!
अंबाजोगाई – माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असुन, ते आजपासूनच धनंजय मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे आज धनंजय मुंडे व माजी आ.संजय भाऊ दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले आहे. माजी आ.संजय भाऊ दौंड हे विधानसभा निवडणुकीत इच्छुक असून, ते धनंजय…
-

मुंडेंच्या कन्येला दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी !
अंबाजोगाई- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे आणि माझे स्नेहपूर्ण सबंध होते,त्यांच्या अकाली निधनामुळे माझे व्यक्तिगत मोठे नुकसान झाले. येणाऱ्या 13 मे रोजी मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर…
-

2022 च्या अनुदान वाटपास सुरुवात !
बीड- राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसान आणि माहे मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 8 लाख 29 हजार 511 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 622.57 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली…
-

जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !
बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई…
-

लोखंडी भरती प्रकरणी चौकशी समिती दाखल !
बीड- अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचारी आणि डॉक्टर भरती प्रकरणी लातूरची चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे.ही समिती कागदपत्रे आणि तत्कालीन सीएस डॉ साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात तब्बल 75 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या सांगण्यावरून महाराष्ट्र विकास ग्रुप…


