बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून साडेचार लाख हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, नदी ओढ्यावरील पूल वाहून गेले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ज्या ज्या मंडळात अतिवृष्टी ची नोंद झाली आहे ती पुढील प्रमाणे आहे.
1. बीड तालुक्यातील राजुरी मंडळामध्ये (75.8 mm), पेंडगाव (72.8 mm), मांजरसुंबा (78.5 mm), चौसाळा (71.3 mm), नेकनूर (71.3 mm), लिंबागणेश (70.5 mm), नाळवंडी (65.5 mm), कुर्ला (69.8 mm), पाली (72.3 mm), बीड (72.3 mm), पिपळनेर (68.3 mm), चव्हाठा (75.8 mm), पारगाव सिरस (75.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
2. पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळामध्ये (95.5 mm), दासखेड (95.5 mm), थेरला (158.3 mm), अंमळनेर (66.0 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
3. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव मंडळामध्ये (69.3 mm), टाकळसिंग (118.3 mm), आष्टी (71.8 mm), धानोरा (67.3 mm), कडा (71.8 mm), धामणगाव (72.0mm), पिंपळा (67.5 mm), डोईठाण (66.0 mm), आष्टा.ह. (71.8 mm), दादेगाव (67.3 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
4. गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळामध्ये (66.3 mm), जातेगाव (68.5 mm), पाचेगाव (68.5 mm), सिरासदेवी (77.5 mm), रेवकी (75.8 mm), तलवाडा (67.5 mm), उमापूर (78.3 mm), चकलंबा (78.3 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
5. माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव मंडळामध्ये (75.0 mm), तालखेड (100.3 mm), नित्रुड (67.5 mm), दिंद्रुड (67.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
6. अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई मंडळामध्ये (73.5 mm), उजनी (80.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
7. केज तालुक्यातील हनुमंत मंडळामध्ये (69.3 mm), विडा (69.8 mm), नांदूरघाट (73.5 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
8. परळी तालुक्यातील धर्मापुरी मंडळामध्ये (80.8 mm), सिरसाळा (76.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
9. धारुर तालुक्यातील धारुर मंडळामध्ये (67.8 mm), मोहखेड (66.8 mm), अंजनडोह (66.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
10. वडवणी तालुक्यातील वडवणी मंडळामध्ये (67.5 mm), कवडगाव (67.5 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
11. शिरुर कासार तालुक्यातील शिरुर मंडळामध्ये (110.0 mm), रायमोहा (122.0 mm), तीतरवणी (84.5 mm), ब्रम्हनाथ येलंब (85.5 mm), गोमळवाडा (66.0 mm), खालापुरी (73.8 mm) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.












Leave a Reply