News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज जे तरूण नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना नोकरी मिळण्याची संधी आहे. घरापासून दूर काम करणाऱ्या लोकांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आज तुमच्याबरोबर असेल. त्यांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे…

  • कोरोमंडल एक्स्प्रेस ला अपघात!पन्नास प्रवासी मृत्युमुखी !!

    कोरोमंडल एक्स्प्रेस ला अपघात!पन्नास प्रवासी मृत्युमुखी !!

    ओडिशा- हावडा येथून चेन्नई ला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात पन्नास पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर 130 हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 132…

  • बीडच्या सीए बियाणी ला 22 लाखाचा दंड अन एक वर्षाची शिक्षा !

    बीडच्या सीए बियाणी ला 22 लाखाचा दंड अन एक वर्षाची शिक्षा !

    बीड – बीड येथील सीए गोविंद बियाणी यांना फसवणूक केल्याप्रकरणी 22 लाख रुपये दंड आणि एक वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.सरकी पेंड खरेदीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश गोरकर यांनी दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. फिर्यादी प्रकाश दत्तोपत गोरकर यांनी चार्टर्ड अकाउंटट गोविंद रामविलास बियाणी यांचे सोबत 80 टन सरकी पेंड 14 हजार…

  • थांबेल तो संक्या कसला ! मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली चक्क बस !!

    थांबेल तो संक्या कसला ! मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली चक्क बस !!

    मुंबई- थांबेल तो संक्या कसला अस म्हणत विक्रमविर अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचं कौतुक केलंय. नाट्यप्रयोग संपल्यावर मुंबईकडे जात असताना बस ड्रायव्हर ची तब्येत बिघडल्याने स्वतः संकर्षण ने गाडी चालवली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत दामले यांनी या आपल्या सहकारी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण…

  • पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!

    पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!

    बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज तुम्हाला फार उत्साही वाटेल, कारण तुमची सर्व रखडलेली कामे आज पूर्ण होतील. आज तुम्हाला आईचं पूर्ण सहकार्य मिळेल. भाऊ-बहिणींबरोबर दिवस आनंदात जाईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये…

  • वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    वैद्यनाथ कारखाना बिनविरोध !बहीण भावाची दिलजमाई !!

    परळी- स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाची दिलजमाई झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. स्वतः पंकजा मुंडे,यशश्री मुंडे,वाल्मिकी कराड आणि अजय मुंडे हे नूतन संचालक असतील. परळी सह मराठवाड्यात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक पदासाठी निवडणूक जाहीर झाली…

  • राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज नातेवाईकांच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते वेळेत परत करा. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जे समाजाच्या…

  • कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…

Exit mobile version