बीड-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बंडखोर पुतण्या डॉ योगेश क्षीरसागर यांना सज्जड दम दिलाय.माझा आणि आजच्या प्रवेश सोहळ्याचा काहीही संबंध नाही,माझा फोटो वापरून जनतेची अन कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे,हे तात्काळ थांबवा अस म्हणत सिनीयर क्षीरसागर यांनी पुतण्याला दम दिला आहे.
बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातील त्यांचे पुतणे माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी काका विरोधात बंडखोरी करत अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे 23 ऑगस्ट रोजी मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे
- आजचे राशीभविष्य!
- पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!
- आजचे राशीभविष्य!
- खोटे अप्रूव्हल, बोगस शालार्थ आयडी :परळीच्या पाच मास्तरांना घरचा रस्ता!
या प्रवेश सोहळ्या साठी डॉक्टर शिरसागर यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिले आहेत तसेच शहरात मोठमोठे होर्डिंग लावले आहेत ज्यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोचा देखील वापर करण्यात आला आहे योगेश यांच्या प्रवेश सोहळ्याचा आणि आपला कुठलाही संबंध नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे राजकीय स्वार्थासाठी आपण कार्यकर्त्यांना आणि जनतेला विश्वासात न घेता निर्णय घेणार नाही असेही त्यांनी म्हटले होते
तरीदेखील डॉक्टर योगेश यांनी आपल्या काकाचा फोटो जाहिरातीत आणि बॅनर वर वापरल्याने संतापलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी या बंडखोर पुतण्याला थेट सज्जड दमच भरलाय नेमकं काय म्हणाले आहेत जयदत्त शिरसागर हे त्यांच्याच शब्दात वाचा……… . !
आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मी कालच जाहीर केली आहे,तरीही माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
काका आणि पुतण्या मधील या शीतयुद्धामध्ये कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक भ्रमित होऊ नयेत म्हणून जगत शिरसागर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.।



Leave a Reply Cancel reply