बीड- गेल्या काही वर्षांमध्ये ब्राह्मण समाजाला टार्गेट करून जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा हेतूने अक्षय पारे वक्तव्य केली जात आहेत नुकतेच एका मंत्र्यांनी देखील मुक्ताफळे उधळली त्यामुळे बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाने आपली एकजूट दाखवत सत्याग्रह आंदोलन केले सर्व संपादक आणि पत्रकारांच्या पुढाकारातून झालेल्या या आंदोलनात यापुढे तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडले जाईल असा इशारा देण्यात आला
बीड येथील ब्राह्मण समाजातील जेष्ठ संपादक आणि पत्रकार यांच्या पुढाकारातून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शेकडो समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले
ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ते संतोष मानूरकर अशोक देशमुख सतीश पत्की प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे एडवोकेट संगीता धसे यांनी यावेळी आपले मत मांडले चंपावती पत्राचे ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांनी समाजाविरोधात वक्तव्य करणाऱ्या तमाम मंडळींचा निषेध करत समाजाने आता वज्रमूठ घट्ट केली पाहिजे असे आवाहन केले
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
गेल्या काही वर्षांमध्ये आणि विशेषतः निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते बालिशसारखी बडबड करतात ब्राह्मण समाजातील काही लोक महापुरुष किंवा इतरांबद्दल आक्षेपार्य बोलत असतील तर त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण समाजाला दोषी धरून वेठीस धरले जाते काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्य आणि निंदनीय वक्तव्य केले त्याबद्दल देखील या सत्याग्रह आंदोलनात इशारा देण्यात आला यापुढे ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल प्रत्येकाने तोंड सांभाळून बोलावे नाहीतर तोंड फोडले जाईल असा इशारा यावेळी उपस्थित आमच्या वतीने देण्यात आला शेकडो ब्रह्म वृंदांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने सत्याग्रह आंदोलनाचा समारोप झाला
Leave a Reply