बीड -गेल्या चार महिन्यापासून भुसंपादन घोटाळा प्रकरणी अटक असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा पाठक यांना मोठा दिलासा मानला जात आहे.
गेवराई तालुक्यातील 154 प्रकरणामध्ये मागील तारखेत वाढीव मावेजा मंजूर केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मे 2026 मध्ये अटक झाली होती.
गेल्या चार महिन्यापासून जिल्हा कारागृहात असणारे पाठक यांनी यापूर्वी दोनवेळा जामीन साठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान बुधवारी छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.




Leave a Reply Cancel reply