News & View

ताज्या घडामोडी

pudhari import wp content uploads 2022 07 6 5 1

चंपावतीने विद्यार्थी विकले तर अधिकाऱ्यांनी तुकड्या वाढवल्या!शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा घोटाळा उघड!

बीड –एकीकडे पटसंख्या मॅनेज करण्यासाठी बीडच्या नावाजलेल्या चंपावती प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना आता बीडच्या माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकारी आणि समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्याने गेवराई तालुक्यातील एका इंग्लिश स्कुल ला चक्क बेकायदेशीर पद्धतीने वर्ग वाढ देऊन तुकड्याना मंजुरी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे अध्यक्ष सादेक इनामदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने तुकडी वाढ देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीडच्या शिक्षण विभागात आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे. एकीकडे बीडच्या चंपावती प्राथमिक शाळेत उत्तराखंड येथील विद्यार्थी खरेदी करून पटसंख्या मॅनेज करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांच्यावर नीलम्बनाची कारवाई करण्यात आली.

दुसरीकडे बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी असलेले धनंजय शिंदे यांनी तसेच समग्र शिक्षा अभियानात प्रोग्रामर असलेले सुरेंद्र रणदिवे यांनी गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल ला सहावी आणि सातवी च्या वर्गाना बेकायदेशीर पद्धतीने मान्यता दिली आहे.

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल ला केवळ पहिली ते पाचवी च्या वर्गाची मान्यता शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र या शाळेला शिंदे आणि रणदिवे यांनी सहावी आणि सातवी च्या तुकड्याना मान्यता दिली. याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे देण्यात आली नाही.

याबाबत गणपत मस्के यांच्यासहित अनेक पालकांनी शिक्षण विभागाला तक्रार केली. त्यानंतर 14 ऑगस्ट 2026 शिक्षण विस्तार अधिकारी आणि दोन केंद्रप्रमुख यांनी तपासणी केली. त्यावेळी शाळेला पाचवीपर्यंत मान्यता असताना सातवी पर्यंत वर्ग भरवण्यात येतं असल्याचे निदर्शनास आले. तसेच शाळेतून काही विद्यार्थी इतर शाळेत वर्ग केल्याचे तसेच या शाळेला दोन वर्ग वाढवण्यासोबत यु डायस नंबर देखील देण्यात आल्याचे दिसून आले. पथक चौकशीला गेल्यानंतर शाळेचे भवर आणि सगळे यांनी दमदाटी केली.

हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर देखील शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केलेली नाही. याबाबत सादेक इनामदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version