News & View

ताज्या घडामोडी

file 0000000089b08211b2d6beed047a8003

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण दशमी श्राद्ध
🌸 नक्षत्र….. पुष्य
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०५ ऑक्टोंबर २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी. ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩


‼️ दैनिक राशी भविष्य ‼️

‼️दिनांक ०५ ऑक्टोंबर २०२६‼️

मेष:- कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ घालवाल. आर्थिक लाभ होतील. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. सकारात्मक कामामध्ये विचारांतून कामाची सुरुवात करावी.

वृषभ:- चांगला दिवस आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या मनानेच कार्यसिध्दि साधेल.

मिथुन:- केल्याने होत आहे आधि केलेच पाहिजे. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. काही कामे परस्पर होतील त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.

कर्क:- कौतुकास पात्र आपली कृती असेल. हितचिंतकांपासून सावध असावे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक सांभाळा. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा.

सिंह:- सर्वसाधारण दिवस आहे. कामामध्ये दिरंगाई किंवा दुर्लक्ष करू नका. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते.

कन्या:- मित्रांचे सहकार्य लाभेल. आनंददायक घटना घडतील. अवश्यक नसेल तर इतरांच्य कामात कमीतकमी हस्तक्षेप करा. कोणाबद्दलही त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते.

तुला:- सकारात्मक कार्य सिध्दि होण्याचा आनंदी असा आजचा दिवस असेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द इतरांना निर्विवाद मान्य होईल.

वृश्चिक:- धावपळ होईल. कामामध्ये उत्साह वाढविण्यासाठी योग प्राणायाम करा. तुमचा मूड चांगला असेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल.

धनु:- आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. तुम्हाला आधिक ऊर्जा मिळेल. आर्थिक प्रश्नांवर मार्ग निघेल. या सोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना चांगला दिवस आहे.

मकर:- आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. स्वतःच्या मतावर ठाम राहा. कार्यसिध्द होतील.

कुंभ:- तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल. इतरांसाठी वेळ द्याल.

मीन:- चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा. तणावरहित राहण्यासाठी आपण ध्यान धारणा करू शकतात. अधिकचा खर्च टाळा. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version