सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण द्बितीया श्राद्ध
🌸 नक्षत्र….. रेवती
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २८ सप्टेंबर २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २८ सप्टेंबर २०२६‼️
मेष: मनाची चंचलता असेल त्यामुळे कामामध्ये विलंब होऊ शकतो मात्र नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे.
वृषभ: अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सकारात्मक विचाराने मानसिक शांतता लाभेल. ध्यान प्राणायाम करणे उपयुक्त ठरेल.
मिथुन: नविन जबाबदारी वाढू शकते. मित्र व सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभेल. नवीन योजना तयार होतील. सामाजिक क्षेत्रात नाव प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.
कर्क: आपल्या कार्य कौशल्यतेमुळे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. त्यामुळे आनंदाने कार्यसिद्धी पार पाडाल. कार्यक्षेत्राचा विस्तार झाल्याने अधिकार वाढण्याची शक्यता. महत्त्वाचे निर्णय घेतांना वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.
सिंह: कार्यसाधक प्रवास होतील नवीन ओळखींतून लाभ होईल. चांगली प्रगती साधेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कन्या: उधारी देण्यापूर्वी विचार करा आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळावा. काही चांगले कामे होऊन मनाची प्रसन्नता लाभेल.
तूळ: संवादातून कार्यामध्ये यश लाभेल. मित्र भागिदारांपासून विवाद निर्माण होऊ शकतात. उपासना करा. सकारात्मकतेमुळे नुकसान कमी होईल.
वृश्चिक: नियोजित कामात परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. सहकाऱ्यांशी संवाद वाढवा. हितशत्रुंपासून काही त्रास होऊ शकतो.
धनु: आवडीच्या गोष्टी कराल मित्र सहकारी मदत करतील. आनंददायक घटनामुळू प्रसन्नता राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेव. मनोरंजनासाठी चांगला दिवस आहे.
मकर: मन प्रसन्न ठेवा. आपल्या कृतीचे भविष्यातील परिणाम विचारात घेऊन निर्णय घ्यावैत. कौटुंबिक जीवन चांगले असेल. घरात शुभ कार्याचे योग आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ: जबाबदारीने केलेल्या कामामुळे प्रतिष्ठा नाव मिळेल. आज प्रवास करावा लागेल. प्रयत्नांतून यश मिळेल. आत्मविश्वास वाढलेला राहील. आर्थिक कामे मार्गी लागतील.
मीन: ताणतणाव असला तरी मार्ग चांगला निघेल. आर्थिक व्यवहारात दक्षता घ्या. आत्मचिंतनाचा दिवस. इतरांच्या सहाय्याने यश मिळेल. आनंदी राहाल.




Leave a Reply Cancel reply