बीड –बीड शहराच्या दक्षिण बाजूने वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये भुमाफियानी भिंत बांधण्याचा उद्योग पुन्हा एकदा सुरु केला आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आदेश धाब्यावर बसवत नदीवर अतिक्रमण करण्याचा प्रकार सुरु आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणी तहसीलदार हे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मनसे चे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
बीड शहरातून वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये सुमती नगर भागात काही भुमाफिया यांनी नदीपात्र अडवून भिंत बांधण्याचा प्रकार न्यूज अँड व्यूजने उघडकीस आणला. या नंतर मनसेचे उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार शेळके यांच्याकडे केली होती.
या बाबत तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी तांदळे व इतरांनी जागेवर जाऊन पंचनामा करत संबंधित लोकांना नोटीस पाठवली आणि बांधकाम केले होते.
याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीने संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र जमीन मोजणी आमचे काम नाही, नदीचे अधिकार जलसंधारण विभागाकडे अशी कारणे नं देता तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.
परंतु मागील दोन दिवसापासून भुमाफियानी पुन्हा एकदा नदी अडवून भिंतीचे बांधकाम सुरु केले आहे. ही बाब समजताच अशोक तावरे यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तावरे यांनी निवेदनात म्हटले आहे कि,करपरा नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवून भुमाफिया यांनी कायद्याचे उल्लंघनं केले आहे. त्यामुळे संबंधित लोकांवर भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करावा तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जाळ कायदा 1974 नुसार कारवाई करावी. तसेच जमीन महसूल कायदा 1966 नुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे.




Leave a Reply Cancel reply