News & View

ताज्या घडामोडी

file 0000000089b08211b2d6beed047a8003

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद शुक्ल द्वादशी
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २३ सप्टेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी . १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️

‼️ दिनांक २३ सप्टेंबर २०२६‼️

मेष:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. तरीही काही सुखद घटना घडतील. त्यामुळे आनंदी राहाल. शत्रू त्रास देतील. विनाकारण धाडस नको. अडचणी वाढू शकतात असे संवाद टाळावेत.

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. मेहनतीने आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. मन अवस्थ राहू शकते. अनामिक भय दाटून येईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मिथुन:- अपेक्षित यश दूर करणारा दिवस आहे. घरात विनाकारण विसंवाद होऊ शकतात. सकारात्मक विचार वाढवावेत. स्थावर संपत्तीचे वाद निर्माण होऊ शकतात. धार्मिक उपासना केल्याने मन स्थिर राहील. हनुमान वडवानलस्तोत्र पाठ करावा.

कर्क:- नियोजित कामामध्ये लाभ मिळतील. घरगुती काम पूर्ण होईल. अचानक धनलाभ संभवतो. वेळेला महत्व द्या कायद्याचे पालन करा. सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते. मनाची चंचलता कमी होण्यासाठी ध्यान प्राणायाम करावा.

सिंह:- ग्रहमान अनुकूल असले तरी आज त्याचा विशेष लाभ मिळणार नाही. राजकारणात विरोधाला सामोरे जावे लागेल. मित्रांचा गैरसमज होऊ शकतो. आर्थिक काम होईल.

कन्या:- सुखद ग्रहमान आहे. तुम्हाला आनंद आणि समाधानकारक घटना घडतील. व्यावसायिक कामामध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. लहानसहान प्रश्नात उगाच जास्त लक्ष घालू नका. सुसंवाद ठेवा.

तुळ:- चांगले यश देणारा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कार्यसंपादन कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. जप आणि अनुष्ठान यातून उत्तम अनुभव येतील. भेटीगाठी होतील.

वृश्चिक:- आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. मात्र चिंता वाढवणारा कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. सामोपचाराने घ्या. श्रीगणेश हनुमान उपासना करा. चांगले अनुभव येतील.

धनु:- बारावा चंद्र मनाची चंचलता वाढवेल. काही अप्रिय अनुभव येतील. अडचणीतून मार्ग सापडेल. मात्रतो कितपत योग्य आहे याची खात्री करून घ्या. प्रवासाचे नियोजन बदलेल. खर्च वाढू शकतो.

मकर:- चांगला दिवस आहे. उत्साहाने कामाला सुरुवात करा. लाभ स्थानी चंद्र अनुकूल आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. संमिश्र ग्रहमान आहे. दैवी उपासना करण्यासाठी चांगला कालावधी आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. मात्र खर्च वाढेल. मित्र सहकारी सहचार्य करतील.

मीन:- नवम स्थानी चंद्र आहे. प्रवास कार्यसाधक होतील. दूर ठिकाणाहून एखादी शुभ बातमी समजेल. संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. राजकीय किंवा सरकारी क्षेत्रातील व्यक्तीकडून त्रास संभवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version