News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल नवमी
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २१ ऑगस्ट २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/०३ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०१ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक २१ आँगस्ट २०२६‼️

मेष:- घरगुती वातावरण आनंददायी राहील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मनाची चंचलता कमी होण्यासाठी ध्यानधारणा उपासना करा.

वृषभ:- संवादकौशल्यामुळे नियोजित कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. नातेवाईक मित्रांच्या भेटीने मनाची प्रसन्नता वाढेल. सकारात्मक राहावे.

मिथुन:- गरजेच्या वस्तुंची खरेदी कराल. कला क्षेत्रात आर्थिक व्यवहारात चांगला लाभ होईल. व्यापार आणि व्यवहारात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क:- पूर्व संकल्पित कामांना गती मिळेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात यश मिळेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आत्मविश्वासाच्या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. तज्ञ व्यक्तींचा सल्ला लाभदायक होईल.

सिंह:- गरजेपेक्षा अनावश्यक खर्च होऊ शकतो. संयम ठेवणे अवश्यक आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळेल.

कन्या:- सामाजिक क्षेत्रात नाव मिळेल. नविन जबाबदारी मित्रांच्या सहकार्याने यश मिळवाल. आर्थिक आवक वाढेल. नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील.

तुळ:- कौशल्यपूर्ण व कलात्मक कामामध्ये यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. भेटीगाठीतून आनंद मिळेल.

वृश्चिक:- उत्साहपूर्वक कामाला सुरुवात होईल त्यातून आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कार्यकौशल्यामुळे यश मिळेल.

धनु:- सकारात्मक विचार वाढवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक धार्मिक कार्यात मन लागेल. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल. इतरांची चिंता सोडा व प्रसन्न राहा.

मकर:- कार्यकुशलता व लोकसंग्रह यांमुळे सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभ होतील. नियोजित कामामध्ये लक्ष द्यावे कामाला चांगली गती मिळेल.

कुंभ:- मित्र संगतीयांपासून अपेक्षित सहकार्य लाभेल.
व्यवसाय! नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नियोजित कामातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सन्मान प्रतिष्ठा मिळेल.

मीन:- नविन कामाची संधी उपलब्ध होईल. कामामध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक लाभ होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version