बीड – ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांच्या आयुष्यात बचत गट व इतर माध्यमातून उमेद निर्माण करण्याच्या हेतूने राज्य सरकारने निर्माण केलेल्या उमेद अभियानाला बीडमध्ये हरताळ फासण्याचे काम सुरू आहे बीडच्या उमेद कार्यालयातील कंत्राटी व्यवस्थापक असलेल्या शेख शकील याच्याविरुद्ध महिलांनी विनयभंग व इतर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी राज्य महिला आयोगापासून ते पोलिसांपर्यंत केलेल्या असताना बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी तीन हे मात्र या अधिकाऱ्याला पाठीशी घालून उमेद अभियानालाच ना उमेद करण्याचा उद्योग करत आहेत.
बीडच्या उमेद कार्यालयातील प्रभारी व्यवस्थापक असणारे शकील शेख यांच्याविरुद्ध 2017 18 पासून म्हणजेच गेल्या नऊ-दहा वर्षांपासून कार्यालयीन महिला कर्मचारी तसेच तालुकास्तरावरील महिलांनी देखील अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी शेख हे अधिकाऱ्यांना मॅनेज करून आपल्या विरुद्धच्या तक्रारी दाबून या पदावर कायम आहेत.
एप्रिल 2026 मध्ये शकील शेख यांच्याविरुद्ध काही महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली ज्यामध्ये शेख हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तालुकास्तरावरून आपल्याला बोलवून घेत आपल्याशी लगट करण्याचा तसेच अत्यंत घाणेरडे इशारे तरुण त्रास देण्याचा प्रकार करतात अशी तक्रार केलेली आहे.
विशेष बाब म्हणजे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या राज्याच्या उपमुख्यमंत्री असून एक सक्षम महिला म्हणून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला परिचित आहे आणि असे असताना त्यांच्याच बीड जिल्ह्यात महिलांवर एक अधिकारी अन्याय अत्याचार करत असेल तर याची गंभीर दखल त्यांनी घेणे अपेक्षित आहे. रहमान यांच्यासारखा एखादा अधिकारी जर महिलांच्या तक्रारी येऊनही त्याची दखल घेत नसेल तर अशा अधिकाऱ्याला देखील सुनेत्रा पवार यांनी समज देणे अपेक्षित आहे.
यानंतर राज्य महिला आयोगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले त्याला देखील अनेक दिवस झाले असले तरी अद्याप पर्यंत रहमान यांनी शकील शेख याच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही.





Leave a Reply Cancel reply