बीड –बीड न्यायालयाच्या एका निर्णयामुळे बीडमधील भाजपला धक्का बसला आहे. बीड नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक भीमराव वाघचौरे यांच्या निवडीला स्थगिती देण्यास बीड न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी वाघचौरे यांच्या वतीने ऍड आनंद पाटील यांनी बाजू मांडली.
बीड नगर पालिकेच्या अध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भीमराव वाघचौरे यांची निवड करण्यात आली होती. या निवडीला भाजपचे उमेदवार रविंद्र कदम यांनी आक्षेप घेत बीडच्या न्यायालयात धाव घेतली होती.
भीमराव वाघचौरे यांना अपात्र ठरवून त्यांच्या निवडीस रवींद्र कदम यांनी आक्षेप घेतला होता व न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भीमराव वाघचौरे यांच्या स्वीकृत सदस्य पदाला स्टे देऊन त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करता येऊ नये यासाठी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरण दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश पुलाटे मॅडम यांच्या समोर सुनावणीस आले होते. त्यांनी कदम यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी वाघचौरे यांच्या वतीने ऍड आनंद पाटील यांनी बाजू मांडली.





Leave a Reply Cancel reply