News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1785523482349

लाचखोर लखमावार ला चार दिवसांची पोलीस कोठडी!

बीड – आपल्याच कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तब्बल 45 लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील वन अधिकारी पदावर असलेल्या श्रीनिवास लखमावार या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तब्बल 45 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करणे तसेच 2024 ते 2026 या काळातील थकीत बिल मंजूर करणे यासाठी 12 टक्के प्रमाणे लखमावार याने 45 लाख रुपये लाच मागितली आणि त्याच्या राहत्या घरी ही लाच घेताना त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजी नगर येथील पथकाने शुक्रवारी अटक केली .

लखमावार याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version