बीड -भारतीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या नावाखाली बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा करून कोट्यावधी रुपये कमावलेल्या एका वैद्याने आपलं पाप झाकण्यासाठी एका चंद्र कांताच्या नादी लागून एक मोठाच कुटाणा केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयात आलेल्या दोघा तक्रादारांना मारहाण केल्या ‘मुळे ‘ तो गेवराईचा एक जेष्ठ वैद्य आणि ज्या मुळे हा कुटाणा झाला ते दोघे चांगलेच अडचणीत आले आहेत.
नागपूर, धुळे, जळगाव, अमरावती या भागात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिक्षक भरती बाबत एस आय टी स्थापन केली. आता त्याला जवळपास एक वर्ष होतं आले आहे. या एस आय टी समोर संस्था चालक, दलाल, बोगस शिक्षक, कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पे युनिट चे अधीक्षक, कर्मचारी यांचे पितळ उघडे पडले आहे.
या सर्वांना एस आय टी समोर हजेरी लावावी लागतं आहे. अशात या बोगस भरती बाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील गंभीर तक्रारी केल्या आहेत. या सगळ्यांची तपासणी उपसंचालक कार्यालय आणि एस आय टी कडून केली जातं आहे. त्या मुळे संस्थाचालक चांगलेच अडचणीत आले आहेत.
एस आय टी आणि उपसंचालक यांच्यापासून शिक्षणाधिकारी ते कर्मचारी यांच्यापर्यंत सगळ्यांना दाम देऊन मॅनेज केल्यानंतर ही चौकशी थांबत नसल्याने काही संस्थाचालक हैराण झाले आहेत.
या हैराण झालेल्या संस्थाचालका मुळे अनेकांचे दुकानं लागणार आहे. अशातच मागील गुरुवारी बीडमधील काही सामाजिक कार्यकर्ते हे छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक कार्यालयात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या कार्यवाह म्हणवून घेणाऱ्या एका वैद्याने त्याच्यासोबत असलेल्या चंद्राचा कांत म्हणवून घेणाऱ्या मुळे च्या सांगण्यावरून त्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण केली.विशेष म्हणजे या मारहाणीत हरी हरी करण्यासाठी आलेले या संस्थाचालकांच्या तालावर नाचणारे काही शिक्षक देखील सहभागी होते.
यामध्ये एकाच्या हाताला फ्रक्चर झाले आहे. ही घटना घडल्यानंतर उपसंचालक यांच्या देखील लक्षात आले कि संस्थाचालक किती हैराण झाले आहेत. या सगळ्या प्रकरणात त्या वैद्याला आणि भ्रष्टाचारात खोलवर पाळे मुळे रुजलेल्या माजी सहकार्यवाह ला देखील चांगलेच परिणाम भोगावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे.





Leave a Reply Cancel reply