News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ कृष्ण अमावस्या समाप्ती दुपारी ०३/१३ मि
🌸 नक्षत्र…. पुर्नवसु
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १४ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस व्यर्ज
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १४ जुलै २०२६‼️

मेष:- सावध राहा व्यवहारात लक्षपूर्वक काम करावे. हितशत्रुं काही उपद्रव करु शकतात. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. संवादातून संबंध दृढ होतील.

वृषभ:- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. संयमाने घ्या वडिलधारींच्या मताचा आदर करा. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील.

मिथुन:- उत्साहवर्धक दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. विवेकपूर्ण संवादकौशल्याचा लाभ होईल. नवीन योजना यशस्वी होतील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल दिवस आहे.

कर्क:- मनाची चलबिचल असली तरी कामामध्ये उत्साह वाढेल. कुटुंबीयांचे मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल.

सिंह:- कामाचे योग्य नियोजन झाल्याने वेळेत कार्यपूर्ती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. आर्थिक कामे होतील.

कन्या:- नविन जबाबदारी वाढेल त्यातून नविन संधी प्राप्त होईल. नियोजित कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तज्ञांचे वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. लाभदायक दिवस आहे.

तुळ:- अनपेक्षित प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवास कार्यसाधक होतील. भाग्याची साथ लाभेल. मित्र सहकारी मदत करतील परंतु पूर्ण विश्वासून राहू नका.

वृश्चिक:- ध्यान उपासना करण्यासाठी अनुकूलता असेल. अनावश्यक खर्चामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय फायदेशीर ठरतील. सुसंवाद साधा.

धनु:- कौटुंबिक जीवन चांगले असेल नियोजित कामामध्ये जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. नवीन करार लाभदायक ठरतील.

मकर:- नविन कल्पना व त्यातून कृतीशीलता यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संयमाची परिक्षा आहे पण यश मिळवाल.

कुंभ:- आवडीच्या कामामुळे आनंद मिळेल. कामामध्ये प्रगती साधेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मैत्री संबंध दृढ होतील मनाची स्थिरता लाभेल.

मीन:- समाधानकारक दिवस आहे. घरगुती वातावरण आनंददायी राहील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. हितसंबंधीत लोकांकडून शुभ समाचार मिळेल. दत्त उपासना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version