बीड – गेवराई वाळू चोरी प्रकरणी 19 जणांवर गुन्हे दाखल झाले असले तरी जो एफ आय आर नोंदवण्यात आला आहे त्यानुसार ऑगस्ट 2025 पासून घरकुलाच्या नावाखाली वाळू चोरी सुरू होती मग प्रश्न असा निर्माण होतो की केले दहा महिने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि गेवराईच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव हे दोघे कस काय अनभिज्ञ होते.हे दोघेही दहा महिने झोपेत होते का?त्यांचा तहसीलदार आणि त्याचे कर्मचारी जर दहा महिन्यापासून राक्षस भुवन गोदावरी पात्रात दिवसाढवळ्या वाळू चोरी करत असतील तर त्यावर कारवाई करण्याऐवजी अर्थपूर्ण दुर्लक्ष तर केले गेले नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतःला क्लीन आणि स्वच्छ प्रतिमेचा म्हणून मिरवणारे जिल्हाधिकारी दहा महिने मूग गिळून का गप्प होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि या वाळू चोरी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
गेवराई तालुक्यातील तहसीलदार संदीप खोमणे अँड कंपनीने घरकुलाच्या नावाखाली वाळू चोरी करत तब्बल 100 कोटी रुपयांचे जे सिंडिकेट चालवले त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले होते
या चौकशीत संदीप खोमणे आणि तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक असे 38 जण दोषी आढळून आले मात्र त्यातील तब्बल 34 कर्मचाऱ्यांना बाजूला करत संदीप खोमणे यांना वगळून खाजगी 13 ते 14 लोक आणि पाच कर्मचारी यांच्यावर मंगळवारी रात्री चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चकलांबा पोलीस स्टेशन मध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात अनेकांची नावे विनाकारण टाकून मूळ दोषी असलेले संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केला आहे.
तक्रारदार नाय तहसीलदार संजय सोनवणे यांची फिर्याद जर का काळजीपूर्वक वाचली तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तलाठी गोविंद ढाकणे व इतरांनी ऑगस्ट २०२५ पासून 25000 ब्रास पेक्षा अधिकचा वाळू उपसा करून शासनाची फसवणूक केली आहे आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे. तक्रार देणारे सोनवणे असो किंवा चौकशी करणारे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन असो यांना एक गोष्ट माहित नव्हती का की हा सगळा चोरी आणि दरोडे घालण्याचा व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार तहसीलदार यांच्या संमतीने त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच हस्ते झालेला आहे
ऑगस्ट 2025 पासून जर वाळू चोरी होत होती तर गेवराईच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी याविरुद्ध का ॲक्शन घेतली नाही त्यांना खोमणे मॅनेज करत होते का ? महिन्याला त्यांना किती आणि कशा स्वरूपात मॅनेज केले जात होते.
कविता जाधव यांच्यासोबत महिन्यातून एकदा का होईना जिल्हाधिकारी हे बैठक घेतच असतील ना मग त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या वाळू चोरी बाबत कधी चर्चा केली नाही का अशी देखील चर्चा आता होऊ लागली आहे
या सगळ्या प्रकरणांमध्ये तहसीलदार खोमणे हे जेवढे दोषी आहेत त्यांच्यापेक्षाही अधिकचा दोष हा उपविभागीय अधिकारी कविता जाधव आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा आहे कारण आपल्या हाताखालचे अधिकारी आणि कर्मचारी हे कशा पद्धतीने चोऱ्या करतात याकडे जर का वरिष्ठांचे लक्ष नसेल तर अशा वरिष्ठांवर देखील कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे अशी मागणी आता होऊ लागली आहे.





Leave a Reply Cancel reply