News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल नवमी
🌸 नक्षत्र…. पु. फाल्गुनी
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २४ मे २०२६
🌚 राहुकाल…. सांय. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/००मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक २४ मे २०२६‼️

मेष:- मित्र सहकारी यांचेबरोबर मर्यादित अंतर ठेवून व्यवहार करा. सकारात्मक विचार वाढवा. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष द्या. अनुकूलता वाढेल. वादावादीचे प्रसंग टाळा.

वृषभ:- प्रवासाचा योग आहे. संवादातून संबंध प्रस्थापित होतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. कामामध्ये मन लागेल. उत्साही असाल.

मिथुन:- घरातील वातावरण चांगले असेल. आर्थिक कामे मार्गी लागतील. योग्य नियोजन करा वरिष्ठांचा सल्ला घ्या मदत मिळेल.

कर्क:- उत्साहपूर्वक केलेल्या कामामुळे आत्मविश्वास वाढेल. नियोजित कामातील निर्णय योग्य ठरतील. दिवस अनुकूल आहे. तरीही संयम अवश्यक आहे.

सिंह:- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. संयमाने कामात प्रगती साधेल. दुसर्‍यांवर विसंबून राहू नका. प्रत्यक्ष कामामध्ये लक्ष द्यावे.

कन्या:- उत्साह राहील लाभातील चंद्र मित्र व सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठा सन्मान वाढेल.

तुळ:- विचारपूर्वक निर्णय घ्या. करिअरमध्ये प्रगती साधेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरेल. कामातील अडथळे काहीप्रमाणात कमी होतील.

वृश्चिक:- नविन कल्पना सुचतील त्या आमलात आणण्यासाठीचे प्रयत्न करावेत. नवीन कार्यात यश. सकारात्मक विचाराने कामात प्रगती साधेल.

धनु:- नियोजित कामामध्ये आर्थिक लाभ होतील. पूर्वीच्ला गुंतवणुकीत फायद मिळू शकेल. अचानक अनपेक्षित घटना घडू शकते. संवादात मधूरता ठेवावी.

मकर:- परिवारीक संबंधांमध्ये सुधारणा होईल. मित्र सहकारी यांबरोबरील भागीदारीत यश मिळेल. काही गोष्टी समजूतदारपणे घ्याव्यात.

कुंभ:- नियोजित कामात यश मिळेल. सहकार्‍यांच्या सहयोगाने प्रगती साधेल. आरोग्य सुधारेल. नियमात राहावे नविन संधी मिळेल.

मीन:- चांगला दिवस आहे. मनाप्रमाणे कामे होतील. प्रेमसंबंधात आनंदी असाल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version