जालना -येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स बँकेत झालेल्या गैरव्यवहारानंतर बँकेवर आरबीआय ने बँकेवर निर्बन्ध घातले आहेत. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेत विलीनकरण होणार आहे. ग्राहकांनी तोपर्यंत वेळ काढावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंटस् बँकेकडून व्यापारी, खातेदारांसह ठेवीदारांचा विश्वासघात झाला असून, सुमारे ५४ कोटीचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने रिझर्व्ह बँकेने निबंध घातले आहेत, त्यामुळे मर्चटस् बँकेचे व्यवहार ठप्प झाले असून, खातेदारांसह ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
चेअरमनसह संचालक समोर येत नसल्याने शुक्रवारी (ता. १०) ठेवीदारांनी मोठी गर्दी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना बँकेत जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मागवावा लागला.
व्यापाऱ्यांची बँक म्हणून विश्वास संपादन केलेल्या जालना मचॅटस् बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचेसांगण्यात येत असून, एका वेअरहाऊस मालकाने वेअरहाऊसमध्ये सोयाबीनचा साठा नसताना तब्बल १७७ जणांचे सोयाबीन तारण असल्याचे दाखवून सुमारे ५४ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून दिल्याचे समोर आले आहे. या कर्जाची मुदतीत परतफेड न झाल्याने हे प्रकरण एनपीएमध्ये गेले. त्यानंतर बँक व्यवस्थापनाने वेअरहाऊसला भेट देवून पाहणी केली असता तेथे सोयाबीनचाकसलाच साठा नसल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे बनावट पावत्या आधारे सोयाबीन तारण दाखवून तब्बल १७७जणांच्या नावाने कर्ज उबलल्याचे स्पष्ट ही बाब लेखा परिक्षणातून निदर्शनास आल्याने रिझर्व्ह बँकेने जालना मर्वटस् बँकेच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. याबाबत माहिती मिळताच ठेवीदारांची धावपळ सुरु झाली असून, झाले.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात आठ ते दहा पतसंस्था आणि मल्टीस्टेट बंद पडल्या आहेत. विशेषतः ज्ञानराधा मल्टीस्टेट बंद झाल्याने हजारो ठेवीदार हौरान झाले आहेत. हजारो कोटी रुपये अडकून पडल्याने पैसे मिळणार कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात आता जालना मर्चंन्ट बँक बंद झाल्याने त्या जिल्ह्यातील ठेवीदार हैराण झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेकडून निबंध आल्याने आता कुठे धावपळ करीत संचालकांनी काल गुरुवारी (ता. ९) जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेवून कैफियत मांडली. यावेळी श्री. बन्सल यांच्या सुचनेवरुन आर्थिक गुन्हे शाखेत जावून संचालकांनी नवीन मार्केट यार्डातील पंचमुखी वेअर हाऊसचा मालक रायचंद सखाराम करंगळ याच्यावरुिध्द १२ कोटी ५० लाखाच्या फसवणुकीची तक्रार दिली. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार अर्जाच्या अनुषंगाने बँक मॅनेजर आणि संबंधित वेअर हाऊसच्या मालकाला बोलावून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेच्या बडीसडकवरील मुख्य शाखेसमोर दररोज रांगा लागत आहेत. आयुष्यभराची बचत अडकण्याच्या भीतीने अनेकजण तातडीने ठेवी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत असलेतरी बँक प्रशासन आणि संचालक मंडळ समोर यायला तयार
नसल्याने संतापाचा भडका उडत आहे. त्यातूनच आज सकाळपासूनच बँकेसमोर मोठा जमाव जमल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना आत जाणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त बोलवावा लागला होता.





Leave a Reply Cancel reply