अहमदाबाद –भारत आणि न्यूजीलंड दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने किवीज चा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताने 256 धावांचे दिलेले टार्गेट किवीज गाठू शकले नाहीत.
संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी तर किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. संजूने सर्वाधिक ४६ चेंडूंत ८९ धावा कुटल्या, ज्यात त्याने तब्बल ८ गगनभेदी षटकार आणि ५ खणखणीत चौकार ठोकले. तर ईशान किशनने २५ चेंडूंत ५४ आणि अभिषेकने २१ चेंडूंत ५२ धावांची स्फोटक खेळी करत मैदानात नुसती आग ओकली.
मधल्या फळीत जेम्स नीशमने सूर्यकुमार यादवला शून्यावर (०) आणि ईशान किशनला लागोपाठ बाद करून भारताची धावगती रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हार्दिक पंड्याही अवघ्या १८ धावांवर बाद झाल्याने टीम इंडियाची धावगती मंदावेल असे वाटले होते.
शेवटी आलेल्या शिवम दुबेने किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुबेने अवघ्या ८ चेंडूंत नाबाद २६ धावा (स्ट्राईक रेट ३२५.००) कुटत टीम इंडियाला पहिल्या डावाच्या अखेरीस एका महाकाय धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला तिलक वर्माची (नाबाद ८ धावा) साथ मिळाली.भारताने न्यूजीलंड समोर 256 धावांचे टार्गेट उभे केले.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना किवी ची सुरवात अडखळत झाली. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि बुमराह ने किवीला धक्के दिले. 11 ओव्हर मध्ये किवीने 102 धावा केल्या होत्या अन त्यांचे पाच फलंदाज बाद झाले होते.





Leave a Reply Cancel reply