बीड – शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्यातील बहुतांश सर्वच संस्थांची नावे येणार आणि तेथील बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे ही भरती करणारे कार्यवाह सहकार्यवाह यांच्यासहित अनेक संस्था चालकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून किमान 75000 ते एक लाख रुपये गोळा केले आहेत एस आय टी चे अधिकारी मॅनेज करायचे आहेत या कारणास्तव संस्था चालकांनी ही वसुली मोहीम राबविली असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात नागपूर येथे शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण उपसंचालक यांच्यापासून ते युनिटच्या अधीक्षकांपर्यंत 20 ते 22 अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले 1000 पेक्षा जास्त बोगस शिक्षक भरती झाल्याचे या माध्यमातून उघड झाले.
अशाच पद्धतीने मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात हजारो बोगस शिक्षकांची भरती करण्यात आल्याचे प्रकरण न्यूज अँड व्यूज ने उघडकीस आणले तब्बल वर्षभर या प्रकरणातील बातम्या करून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला.
या बातम्यांची दखल घेत आणि आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी वर कारवाई करत राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात शालार्थ आयडी प्रकरणात येस आय टी ची स्थापना केली. गेल्या चार ते पाच महिन्यात या समितीने बोगस भरती प्रकरणात जे पुरावे गोळा केले आहेत त्यामुळे संस्थाचालक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
एस आय टी मधील अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याच्या नावाखाली बीड मधील अनेक संस्था चालकांनी किमान 75000 आणि कमाल एक लाख रुपये प्रत्येकी गोळा केले असून हे पैसे संस्थाचालक खिशात घालणार की खरोखरच मॅनेजमेंट करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
बीड शहरात ज्या ज्या संस्थांचे एक एक युनिट आहे किंवा ज्या संस्थांचे मराठवाड्यात जाळे पसरले आहे त्या संस्थांवरील कार्यवाह सहकार्य वाह प्रशासक सभापती कोषाध्यक्ष या पदावर असणाऱ्या लोकांनी कर्मचाऱ्यांकडून ही वसुली केली असून नोकरी लावताना घेतलेले लाखो रुपये त्यानंतर एरियर्स चे घेतलेले लाखो रुपये आणि आता पुन्हा मॅनेज करण्यासाठी म्हणून घेतले गेलेले लाखो रुपये जर संस्था चालक घेणार असतील तर आपण नोकरी करायचीच कशाला अशी चर्चा आता होऊ लागली आहे.





Leave a Reply Cancel reply