नवी दिल्ली – एशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धूळ चारत भारतच चॅम्पियन असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेमध्ये भारताने तिसऱ्यांदा पाकचा पराभव केला आहे. अंतिम सामन्याचा हिरो ठरला तो अर्धशतक वीर तिलक वर्मा.
एशिया कप ची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 147 धावांचे लक्ष ठेवले भारताकडून कुलदीप यादव ने चार बळी घेतले.
147 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताचे तीन फलंदाज अवघ्या बारा धावांवर तंबूत परतले मात्र त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. संजू बाद झाल्यानंतर आलेल्या शिवम दुबे ने जोरदार फटकेबाजी करत भारताला विजया समीप नेऊन ठेवले.
अंतिम सामना खेळणाऱ्या रिंकू सिंग याने विजयी चौकार लागवत भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून तिलक वर्मा याने अर्धशतकी खेळी केली.





Leave a Reply Cancel reply