बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत दिन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
जानेवारी 2024 मध्ये बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांच्यासह उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी पुण्यातून सुरेश कुटे यांच्यासोबत बीडच्या एसपी ऑफिस मध्ये आणण्यात आलेल्या अर्चना कुटे यांना सोडून देण्यात आले होते.
दरम्यान तब्बल पंधरा महिन्यांनी सी आय डी ने अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक केली. त्यांना न्यायालयाने 28 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनवली होती
रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली.





Leave a Reply Cancel reply