बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या न्यायालयात सुनावणी झाली. येत्या 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी दोष निश्चिती होईल अशी माहिती जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी दिली.
वाल्मिक कराडच्या वतीनं जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी येत्या 30 तारखेला आहे.
या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. वाल्मीक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली नव्हती, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
दरम्यान या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड याच्या वकिलाने त्याला जामीन का मिळाला पाहिजे? याविषयी युक्तिवाद केला. त्याला आम्ही विरोध केला. त्याबाबतची कारणे देखील स्पष्ट केली. दुसरा आरोपी विष्णू चाटे याने देखील दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला. यावर आम्ही न्यायालयाचे अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधले. अनेक मुद्दे मांडत वाल्मीक कराडच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे, त्यावर येत्या 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे, असं निकम यांनी म्हटलं आहे. दरम्यान वाल्मिक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला. परंतु आम्ही ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, असंही यावेळी निकम यांनी म्हटलं आहे.












Leave a Reply