News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1733757974530

शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे शासनाला लुटण्याचा प्रकार!

स्पेशल एस आय टी कडून राज्यभरात चौकशी -मुख्यमंत्री!

मुंबई – बोगस शालार्थ आयडी तयार करून नागपूर सहित विदर्भात बोगस शिक्षकांची भरती करण्याचा प्रकार म्हणजे मोठे पाप आहे हा शासनाला लुबाडण्याचा आणि फसवण्याचा प्रकार असून राज्यभरात इतरही ठिकाणी अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरती झाल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल एसआयटी ची स्थापना करण्यात आली असून यामध्ये दोषी असणारे अधिकारी संस्था चालक आणि शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्यभरात गाजलेल्या नागपूरसह इतर जिल्ह्यातील शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती प्रकरणावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विरोधी पक्षनेते विजयवाडी तिवार यांनी याबाबत उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत.

याबाबत आपण शिक्षण मंत्र्यांची सविस्तर चर्चा केली असून बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांची बोगस नियुक्ती करणे हा शासनाला लुटण्याचा प्रकार असून हे एक प्रकारचे पापच आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या विरोधात पुरावे आढळले अशा 20 ते 22 अधिकारी आणि संस्थाचालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून चार शीट दाखल करण्यात येणार आहे.

नागपूर प्रमाणेच बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी काढून बोगस शिक्षकांची भरती केल्याची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची चौकशी सुरू असून स्पेशल यासाठी मार्फत जिल्ह्यातील संस्था चालकांची देखील कसून चौकशी होणार आहे त्यामुळे आपल्यावर कुठल्याही संकट येऊ नये म्हणून अनेक संस्था चालकांनी यंत्रणेकडे मॅनेजमेंट लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याच्या तक्रारी असून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण खानदेश या भागात अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरती झाली असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी स्पेशल यासाठीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून बोगस शिक्षक भरती करणारे शिक्षणाधिकारी उपसंचालक संचालक आणि संस्था चालक या सर्वांविरोधात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील हे एक प्रकारचे मोठे पाप असून शासनाची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये व त्यांच्या पत्नी यांचा आक्रोश सत्य असून या प्रकरणात पोलीस विभागामार्फत 37 साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आले आहेत अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून मोबाईल कॉल्स ई-मेल आणि इतर माध्यमातून झालेले संभाषण रेकॉर्डवर घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *