News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यते शिवाय पगार नाही!

बीड -खाजगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार काढण्यासाठी यापुढे त्यांचे शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यतेचे आदेश सोबत जोडावे लागणार आहेत. अन्यथा पगार बिल काढली जाणार नाहीत असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे बोगस भरती झालेल्या शिक्षक आणि संस्थाचालक यांचे धाबे दनानले आहेत.

२०२२ ते २०२५ पर्यंत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आयडी व मान्यतेचा आदेश: ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती २०२२-२०२३, २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या वर्षात झाली आहे त्यांची शालार्थ आयडी मान्यता पत्र व शिक्षक मान्यतेच्या आदेश क्रमांक देण्याची मागणी लेखी पत्रातून वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाने केली आहे. त्यात आपल्या शाळेतील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मानण्याचे आदेश द्यावेत, असेही नमूद केले आहे.

२०२२ ते २०२५ या कालावधीत शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या शिक्षण उपसंचालक नागपूर व अध्यक्ष विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, नागपूर यांचे शालार्थ आयडीचे पत्र द्यावे, हे पत्रात विशेषतः नमूद केले आहे.

खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित सैनिकी शाळा, खासगी अनुदानित अध्यापक विद्यालये, नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अंशतः माध्यमिक उच्च, माध्यमिक शाळांचा त्यात समावेश आहे.

प्रपत्रात पदाच्या तपशील, रिक्त पदे, अतिरिक्त पदांची माहिती वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मे २०२५ ची नियमित देयके स्वीकारली जाणार नाहीत, असे या लेखी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय शाळेत कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांची माहिती एका प्रपत्रात मागितली आहे, ते प्रपत्रसुद्धा वेतन पथक कार्यालयाने शाळांना पाठविले आहे. यात मंजूर पदे, कार्यरत पदे, अतिरिक्त पदे यांचा त्यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version